▪️ यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंटच्या वतीने नऊ तास चाललेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद..

वणी – यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट, वणी यांच्या वतीने 16 फेब्रुवारी 2025 रोजी भव्य धम्ममय शिवसकाळ भीमसकाळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नऊ तास चाललेल्या या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या उपस्थितीत, महामानवांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून झाली. यामध्ये व्याख्यान, लेझीम पथक, गायन, कव्वाली, रॅप, शायरी आणि सन्मान व नृत्य सादरीकरण यांचा समावेश होता.
मुख्य आकर्षणांमध्ये –
- ॲड. स्मिताताई कांबळे यांनी युवकांना मार्गदर्शन केले.
- बॉलीवूड शायर प्रणय सतलज यांनी शायरी सादर केली.
- आयुप परिपगार व टीम यांनी महामानवांची जीवनगाथा नृत्यातून मांडली.
- भीम क्रांतीचा बुलंद आवाज, आयु. विकास राजा यांनी प्रबोधनपर कव्वाली सादर केली.
- अदिती पुडके, सुरज आतिश यांचे गीतसंगीत हृदयस्पर्शी ठरले.
- रॅपर अंकुश शिरसाट, क्षितिज लोणारे, सेजल रामटेके यांनी महामानवांचे विचार प्रभावीपणे मांडले.
- खतरनाक सुमित, वंदना सिद्धार्थ यांनी शायरीद्वारे सामाजिक सलोखा आणि समतेचा संदेश दिला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हेमंतकुमार टीपले, रज्जत सातपुते, प्रेम अडकिने, आकाश बोरकर सुरज खैरे, आदित्य वाळके, इस्माईल शेख, गौरव जवादे, हर्षल चापडे, अंकित पाझारे, तन्मय लामसोगे, अंकित, संदेश लोहकरे, अष्टांग खोब्रागडे, झीयान जुबेर खान , काजल वाळके, जयाताई सोनटक्के, अंकिता पथाडे आणि इतर पदाधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. सूत्रसंचालन रज्जत सातपुते यांनी तर आभार प्रदर्शन काजल वाळके यांनी केले.
हा कार्यक्रम वणीकर जनतेसाठी प्रेरणादायी आणि ऐतिहासिक ठरला.

