Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चंद्रपूर
  • उडान पुलाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव द्यावे – सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळाची मागणी
  • चंद्रपूर

उडान पुलाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव द्यावे – सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळाची मागणी

NewWaniDiary 22/02/2025

चंद्रपूर – २१ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री सत्यशिव गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने अध्यक्ष मधुकर मालेकर यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील मान्यवर प्रशासनिक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यात पालकमंत्री अशोक उड़के, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, बांधकाम विभागाचे अधिकारी आणि तहसीलदार यांचा समावेश होता.

निवेदनात त्यांनी नव्याने सुरू झालेल्या उड्डाण पुलाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे मानवतावादी क्रांतिकारक व स्वातंत्र्य सेनानी होते. १९६२च्या भारत-चीन युद्धातही त्यांनी योगदान दिले होते.

यावेळी निवेदन सादर करताना मधुकर मालेकर, नारायण ठेंगणे, संजय भोंगळे, गणेश शेंडे, गणेश वजे आणि घुग्घुस येथील अनेक गुरुदेव भक्त उपस्थित होते. मंडळाने प्रशासनाला ही मागणी तात्काळ मान्य करण्याचे आवाहन केले, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

Continue Reading

Previous: शिवसकाळ भीमसकाळ कार्यक्रम वणीकर जनतेसाठी प्रेरणादायी आणि ऐतिहासिक ठरला..
Next: दलित वस्तीतील सार्वजनिक शौचालय बांधकाम सुरू करण्याची तातडीने मागणी!

Related Stories

SAVE_20260711_155021
  • चंद्रपूर

अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचा अपघातग्रस्त कुटुंबाला आर्थिक व शैक्षणिक आधार

NewWaniDiary 11/07/2026
SAVE_20260605_121529
  • चंद्रपूर

स्थानिक बेरोजगारांचे आमरण उपोषण चौथ्या दिवशी; काळे फासून प्रशासनाविरोधात तीव्र निषेध

NewWaniDiary 05/06/2026
SAVE_20260416_155022
  • चंद्रपूर

गुडसेला येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण

NewWaniDiary 16/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.