Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी येथे; राज्यव्यापी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी परिषद
  • वणी

वणी येथे; राज्यव्यापी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी परिषद

NewWaniDiary 23/08/2025

वणी (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने वणी येथे दि. 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता शेतकरी मंदिरात राज्यव्यापी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेचे मार्गदर्शक म्हणून किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष काॅ. राजन क्षिरसागर (परभणी), प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले (नागपूर), शेतकरी नेते काॅ. तुकाराम भस्मे (अमरावती), राज्याध्यक्ष अॅड. हिरालाल परदेशी (धुळे), राज्यसचिव काॅ. अशोक सोनारकर (अमरावती) व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

परिषदेचे प्रमुख मुद्दे :

  1. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान हमी भावाचा कायदा करावा.
  2. कापूस व सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू करून शेतकऱ्यांना उत्पादनात हिस्सेदारी द्यावी.
  3. आयात-निर्यात धोरण शेतकरीहिताच्या दृष्टीने ठरवावे.
  4. पीक विमा कंपनी सरकारी असावी व नियम स्थानिक परिस्थितीनुसार ठरवावेत.
  5. सरकारी खरेदी केंद्रे वेळेत व पूर्ण क्षमतेने सुरू करून खुल्या बाजारातील लूट थांबवावी.
  6. जंगली जनावरांच्या नुकसानीची तातडीने भरपाई करण्याचा कायदा करावा.

ही परिषद केवळ मागण्यांची यादी नसून शेतकरी हक्कांसाठी ठाम संघर्षाची सुरुवात आहे. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या लढाऊ परंपरेतून प्रेरणा घेऊन सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य किसान सभा यवतमाळ जिल्हा कौन्सिलतर्फे करण्यात आले आहे.

या आवाहनात काॅ. अनिल हेपट, अनिल घाटे, मोरेश्वर कुंटलवार, गणेश कळसकर, बंडु गोलर, वासुदेव गोहणे, रवी गोरे, गणेश शिटलवार, पंढरी मोहीतकर, पांडुरंग ठावरी, राकेश खामणकर, अथर्व निवडींग, सौ. छाया गावंडे, सुरेखा हेपट, प्रा. धनंजय आंबटकर, गुलाबराव उमरतकर, दिपक माहुरे, दिवाकर नागपुरे, संजय भालेराव, प्रा. प्रविण बंसोड, विजय ठाकरे, ऋषी उलमाले, दिलीप महाजन, अॅड. अरुण जवके, अमोल गौरशेट्टीवार, पि.जी. गावंडे, प्रदीप नगराळे, लक्ष्मणराव खंडारे आदींनी सहभाग नोंदविला आहे.

Continue Reading

Previous: वणी येथे; हस्तकला कार्यशाळेचा यशस्वी समारोप
Next: वणीतील सुभद्राबाई रघुवीर यांचे निधन

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.