Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी येथे; हस्तकला कार्यशाळेचा यशस्वी समारोप
  • वणी

वणी येथे; हस्तकला कार्यशाळेचा यशस्वी समारोप

NewWaniDiary 23/08/2025

वणी (प्रतिनिधी): भारत सरकार वस्त्र उद्योग मंत्रालय विकास आयुक्त (हस्तकला) नागपूर व शिवकृपा बहुउद्देशीय संस्था उकणी वणी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १८ ते २० ऑगस्ट २०२५ दरम्यान राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय, वणी येथे आयोजित तीन दिवसीय हस्तकला कार्यशाळेचा समारोप सोहळा वणी पब्लिक स्कूलच्या सभागृहात उत्साहात पार पडला.

या समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षपद संजय खाडे, अध्यक्ष शिवकृपा बहुउद्देशीय संस्था उकणी वणी यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून अभय पारखी (मुख्याध्यापक, राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय, वणी) व राकेश देशपांडे (प्रिन्सिपल, वणी पब्लिक स्कूल, वणी) उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत तयार केलेल्या हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन पाहून सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना संजय खाडे यांनी हस्तकला क्षेत्रातील संधींबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातून स्वतःचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे असे आवाहन केले.

प्रमुख अतिथी अभय पारखी व राकेश देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करून त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून आशिष पाटील, गणू रावत, अनिल वाघमारे व प्रमोद देशमुख यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घोडके सर (सहाय्यक शिक्षक, राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालय) यांनी केले, तर आभार प्रदर्शन गजानन अलोने (CEO, शिवकृपा बहुउद्देशीय संस्था उकणी वणी) यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय शेंडे, विनीत तोडकर तसेच शाळेतील शिक्षक व १०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग लाभला.

Continue Reading

Previous: रस्त्यांची दुरवस्था, शेतकऱ्यांचा मोबदला व शैक्षणिक सोयींसाठी २५ ऑगस्ट रोजी उकणीत चक्काजाम आंदोलन
Next: वणी येथे; राज्यव्यापी कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी परिषद

Related Stories

SAVE_20261019_125459
  • वणी

‘भाऊचा दांडिया’ उत्सवात काँग्रेस नेते संजय खाडे यांचा सत्कार

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 17, 2026, 10_35_45 PM_11zon
  • वणी

वणी पोलीस ठाण्यातील अमरदीप दुर्गोत्सवाची ४२ वर्षांची परंपरा कायम

NewWaniDiary 17/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.