
वणी (प्रतिनिधी) : शिवसेना वणीच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बालगोपालांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी भव्य तान्हा पोळा उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
हा उत्सव शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता शासकीय मैदान, पाण्याची टाकी, वणी येथे आयोजित करण्यात आला आहे.
तान्हा पोळ्यानिमित्त बैल पोळ्याच्या पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणाऱ्या बालगोपालांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी बालगोपालांना प्रोत्साहन देण्यासाठी सायकल, इलेक्ट्रिक ट्रायसिकल, ट्रायसिकल, स्कूटर यांसह विविध आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. एकूण २० सायकलींसह अनेक बक्षिसांचा समावेश आहे.
कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून, एकूण ३०० नोंदणींची मर्यादा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक पालकांनी आपल्या पाल्याची वेळेत नोंदणी करून या पारंपरिक उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना जिल्हा संघटक, यवतमाळ तथा आयोजक विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने करण्यात आले आहे.
