
वणी प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी वणी शहराच्या वतीने वणी शहरातील बालगोपालांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘तान्हा पोळा सजावट स्पर्धा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता कल्याण मंडपम, मोठा हनुमान मंदिराजवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वणी येथे होणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश निःशुल्क असून वणी शहरातील बालगोपालांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेसाठी दोन वयोगट निश्चित करण्यात आले आहेत.
‘अ’ गट – वय १ ते ५ वर्षे
🥇 प्रथम – ₹५,००० | 🥈 द्वितीय – ₹३,००० | 🥉 तृतीय – ₹२,०००
‘ब’ गट – वय ६ ते १२ वर्षे
🥇 प्रथम – ₹४,००० | 🥈 द्वितीय – ₹३,००० | 🥉 तृतीय – ₹२,०००
याशिवाय प्रत्येक गटासाठी ₹१,००० ची तीन प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार असून सहभागी बालगोपालांसाठी आकर्षक भेटवस्तूही ठेवण्यात आल्या आहेत.
स्पर्धेतील सजावट पर्यावरणपूरक व स्वदेशी वस्तूंच्या माध्यमातून करण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धकांनी दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक असून स्पर्धेच्या वेळेच्या किमान १० मिनिटे आधी उपस्थित राहावे लागणार आहे.
पारंपरिक पोळा सणाची संस्कृती, बैलांविषयीचा स्नेह आणि पर्यावरणपूरक सजावटीचा संदेश बालगोपालांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेचे संयोजक रवि बेलूरकर, जिल्हा उपाध्यक्ष, यवतमाळ असून नीता पिदूरकर, वैशाली वातिले, प्रतिभा मंथनवार, विलास डवरे, मयूर गोयनका व नितीन बिहारी हे सहसंयोजक म्हणून कार्यरत आहेत.
वणी शहरातील पालकांनी आपल्या पाल्यांना या स्पर्धेत सहभागी करून त्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि ॲड. निलेश चौधरी, शहर अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी वणी यांनी केले आहे.
