Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • यवतमाळ
  • स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी १० घरफोड्या व १ चोरीच्या गुन्ह्यासह एकूण ११ गुन्हे उघडकीस
  • यवतमाळ

स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी १० घरफोड्या व १ चोरीच्या गुन्ह्यासह एकूण ११ गुन्हे उघडकीस

NewWaniDiary 14/02/2025

स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी १० घरफोड्या व १ चोरीच्या गुन्ह्यासह एकूण ११ गुन्हे उघडकीस आणले. या कारवाईत ३४५.१ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २०० ग्रॅम चांदीच्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या.

गेल्या काही दिवसांत यवतमाळ जिल्ह्यात घरफोडीच्या घटना वाढल्या होत्या, ज्यामुळे पोलीस अधीक्षक कुमार चिता यांनी तपास जलदगतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने विविध पथकांच्या मदतीने संशयित आरोपींना अटक केली.

मुख्य कारवाई:

रोशन क्षिरसागर (यवतमाळ) यास अटक करून ७ घरफोड्यांचे गुन्हे उघड; ११५.९८ ग्रॅम सोन्याचे दागिने (२.९९ लाख रुपये) हस्तगत.

पंकज गोंडाने व सागर गोगटे (अमरावती) यांना अटक; २ घरफोड्यांचे गुन्हे उघड; ११९.१२० ग्रॅम सोन्याचे दागिने व ३ मोबाईल (१०.५७ लाख रुपये) हस्तगत.

नंदा डुकले, रोहित डुकले, शीतल पवार व एका अल्पवयीन मुलीला (छ. संभाजीनगर) अटक; सराफा दुकानातील सोन्याचा हार चोरीचा गुन्हा उघड; ६० ग्रॅम सोन्याचा हार (४.३० लाख रुपये) हस्तगत.

रशिद शहा ऊर्फ तलवार सिंग (अकोला) यास अटक; ५० ग्रॅम सोन्याचे दागिने व २०० ग्रॅम चांदीच्या वस्तू (६०,००० रुपये) हस्तगत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Continue Reading

Previous: मोहादा येथे; छत्रपती शिवाजी महाराज जन्मोस्तवाचे आयोजन..
Next: 14 फेब्रुवारीला रात्री मारेगाव तालुक्यात:भूकंपाचा धक्का

Related Stories

SAVE_20260212_191015
  • यवतमाळ

देशव्यापी संप ला पाठिंबा दर्शवित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

NewWaniDiary 13/02/2026
SAVE_20251209_142131
  • यवतमाळ

शिवविवाहात महामानवांच्या विचारांचा जागर – यवतमाळ व वरोरा वासियांनी अनुभवला आदर्श शिवविवाह

NewWaniDiary 09/12/2025
SAVE_20251116_211916
  • यवतमाळ

सीटू संघटनेचा कुष्ठरोग सर्वे न करण्याचा निर्णय  

NewWaniDiary 16/11/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.