Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • निलजई येथे:सलग दुसऱ्या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू..
  • वणी

निलजई येथे:सलग दुसऱ्या दिवशी कामगारांचे उपोषण सुरू..

NewWaniDiary 28/01/2025

▪️ संजय खाडे यांची उपोषण मंडपाला भेट..

वणी – वेकोलिसाठी काम करणाऱ्या एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉईन्ट वेन्चर या कंपनीने 65 कामगारांना नोकरीवरून काढले. याविरोधात कामगारांनी सोमवारपासून निलजई येथील कंपनीच्या गेटसमोर उपोषण सुरू केले आहे. मंगळवारी उपोषणाचा दुसरा दिवस होता. मात्र संध्याकाळ पर्यंत कंपनीकडून कोणताही निरोप न आल्याने उपोषण सुरूच होते. कामगार नेते व वेकोलिचे टीएससी मेंबर संजय खाडे यांनी या उपोषण मंडपाला भेट देत त्यांना पाठिंबा जाहीर केला. कामगारांना न्याय मिळावा यासाठी वरिष्ट पातळीवर चर्चा सुरू केली आहे. जो पर्यंत कामागारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत कामगारांसोबत राहण्याचे वचन त्यांनी दिले.

एचडी एन्टरप्राईजेस व गौरव जॉइंट वेंचर प्रा. लि. ही कंपनी निलजई ओपनकास्ट खाणीसाठी ओ.बी. उत्खननाचे काम करते. गेल्या 5 वर्षांपासून या कंपनीचे काम सुरु आहे. या कामासाठी एचडी एन्टरप्राईजेस या कंपनीचे 35 डंपर व गौरव जॉइंट वेंचर या कंपनीचे 60 डंपर सुरु आहेत. सध्या ही कंपनी पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. मात्र असे असूनही या कंपनीत काम करणा-या 65 कामगारांना नोकरीवरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. या विरोधात कामगारांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

उपोषण मंडळाला एसडीपीओ गणेश किंद्रे, शिरपूरचे ठाणेदार माधव शिंदे, पीएसआय रावसाहेब बुधवट यांच्यासह प्रमोद वासेकर, राजू अकंतवार, तेजराज बोढे, शंकर व-हाटे, अशोक चिकटे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली. सोमवारी कंपनीचे प्रतिनिधी म्हणून मॅनेजर व इनचार्ज यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेत चर्चा केली. त्यांनी कामगारांच्या मागण्या व्यवस्थापन पर्यंत पोहोचवून मंगळवारी स. 10 वाजेपर्यंत निरोप देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र कंपनीकडून कोणताही निरोप न आल्याने उपोषण सुरूच होते.

कामगारांचे उपोषण त्यांच्या हक्कासाठी – संजय खाडे

स्थानिकांना रोजगारात प्राधान्य देणे हे कंपनीचे कर्तव्य आहे. मात्र कंपनी भूमिपुत्रांवरच अन्याय करीत आहे. कामगारांचे उपोषण त्यांच्या हक्कासाठी असून कंपनीने त्यांना तात्काळ नोकरीवर रुजू करावे.

विशाल गोवारदीपे, कानुजी लोनगाडगे, प्रभाकर खोब्रागडे, संदीप भोयर, रवि गुरनुले, प्रविण कातारकर, मनोज खाड़े, प्रकाश इंगोले, श्रीकांत निंदेकर, अरुण डाहुले, अनिल डोंगे, वासुदेव चिडे यांच्यासह सुमारे 40-50 कामगार उपोषणाला बसले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Continue Reading

Previous: वणी पोलीस स्टेशन येथे:मुस्लिम समाजाची बैठक..
Next: २६ जानेवारी संविधान अंमलबजावणी दिनाचे औचित्य साधून बाबासाहेबांच्या पक्ष संघटनेत संविधान अंमलबजावणी करण्यासाठी निर्धार करू या.!

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.