
वणी – विदर्भ राज्य आंदोलन समितीने लोकसहभाग वाढवून आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी 23 व 24 मार्च 2025 रोजी नागपुरात तिसरे अधिवेशन आयोजित केले आहे. अधिवेशनात विदर्भाच्या स्वतंत्र राज्याच्या मागणीवर सखोल चर्चा होणार आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या, प्रदूषण, कुपोषण, बेरोजगारी व नक्षलवाद यांसारख्या गंभीर प्रश्नांवर अभ्यास करून त्यावर उपाययोजना मांडल्या जातील.
विदर्भाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सिंचन, रस्ते, उद्योग, शिक्षण व आरोग्य यांसारख्या क्षेत्रांतील मोठ्या आर्थिक अनुशेषावरही चर्चा केली जाईल. विदर्भ हे सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम राज्य होऊ शकते, हे अधिवेशनात मांडण्यात येईल. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 3 नुसार केंद्र सरकारने विदर्भ राज्याच्या निर्मितीचा त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी होणार आहे.

अधिवेशनानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्याची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. बैठकीत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप,कृष्णराव भोंगाडे, बाळकृष्ण राजूरकर, राहुल खारकर,रफिक रंगरेज, नामदेवराव जेणेकर, देवांश बोन्डे,मारोतराव बोथले ,अमित उपाध्ये,मंगेश रासेकर,संजय चिंचोळकर,अनिल गोवारदिवे,आशुतोष देशपांडे, युवराज बोबडे,राजू पिंपळकर, प्रसन्न शिवनकर,दशरत पाटील, श्रीकांत सरमोकदम अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

