Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चळवळ
  • आज वणीत: त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बुद्ध भीम गीतांच्या प्रबोधन कार्यक्रम..
  • वणी
  • चळवळ

आज वणीत: त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बुद्ध भीम गीतांच्या प्रबोधन कार्यक्रम..

NewWaniDiary 08/02/2025

वणी – आज वणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच, वणी यांच्या वतीने ८ फेब्रुवारी २०२५ रोजी वणी येथील शासकीय मैदानावर माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमगीत आणि प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील लोकप्रिय भीमगीत गायिका, भीम कन्या कडूबाई खरात आपली सुमधुर गाणी सादर करून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे महत्व सांगणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून उभ्या राहून त्या समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत.

माता रमाई आंबेडकर यांनी समाजासाठी केलेल्या त्यागमय योगदानाची जाणीव ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महिलांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

या कार्यक्रमाला अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Continue Reading

Previous: सुजाता थिएटर मे ता. 7 फरवारी से 🎬 “पदमावत और देवा” रोजना 4शो मे
Next: सक्षम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये: विद्यार्थ्यांच्या कला सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न!

Related Stories

SAVE_20260417_165025_11zon
  • वणी

पिंपळखुटी ते यवतमाळ १०० किमी पायी लाँग मार्च; शेतकरी, कामगार व योजना कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या

NewWaniDiary 17/04/2026
SAVE_20260413_151328
  • वणी

भीम टायगर सेनेतर्फे आज वणीमध्ये भव्य भीम गीतांचा कार्यक्रम व सत्कार सोहळा

NewWaniDiary 13/04/2026
SAVE_20260412_172132
  • वणी

मुकुटबन ग्रामपंचायतीची तपासणी वादात; राजकीय दबावाचे आरोप

NewWaniDiary 12/04/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.