
वणीतील सक्षम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उंची उडान हा विद्यार्थ्यांच्या कला आणि गुणांना वाव देणारा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाला संजय खाडे अध्यक्षस्थानी होते आणि त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष विघ्ने, वैशाली परेकर आणि भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश रायपुरे उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादरीकरण केले. कार्यक्रमाचे आयोजन कर्मा तेलंग यांच्या संस्थेच्या वतीने करण्यात आले.
यावेळी विध्यार्थी व विध्यार्थ्यांचे पालक शिक्षिका मोट्या संखेने उपस्थित होते.
