
चंद्रपूर (प्रतिनिधी) : चंद्रपूर येथे मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळूभाऊ धानोरकर मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भाऊचा दांडिया’ रास-दांडिया उत्सवात दि. १८ ऑक्टोबर रोजी काँग्रेस नेते संजय खाडे यांचा सत्कार करण्यात आला.
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उत्सवाला गेल्या नऊ दिवसांपासून हजारो नागरिक उपस्थित राहून रास-दांडियाचा आनंद घेत आहेत. पारंपरिक नृत्य, उत्साह आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या उत्सवाला विशेष रंगत आली आहे.

या उत्सवाच्या आयोजनासाठी मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि बाळूभाऊ धानोरकर मित्रपरिवाराचे अभिनंदन करण्यात आले.
