Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • यवतमाळ
  • आशा व गटप्रवर्तक संघटना सिटूच्या जिल्हा अध्यक्षपदी ॲड. कुमार मोहरमपुरी तर जिल्हा सचिवपदी उषा मुरखे यांची निवड
  • यवतमाळ

आशा व गटप्रवर्तक संघटना सिटूच्या जिल्हा अध्यक्षपदी ॲड. कुमार मोहरमपुरी तर जिल्हा सचिवपदी उषा मुरखे यांची निवड

NewWaniDiary 12/02/2025

▪️ आशा व गटप्रवर्तक संघटना ( सिटू ) चे दुसरे जिल्हा अधिवेशन यवतमाळ येथे संपन्न..

यवतमाळ : आशा व गटप्रवर्तक संघटना ( सिटू ) चे दुसरे जिल्हा अधिवेशन ९ फेब्रुवारी २०२५ रोजी यवतमाळ येथील कॉमरेड सीताराम येचुरी सभागृह ( भावे मंगल कार्यालय ) येथे संपन्न झाले. दर तीन वर्षांनी होणाऱ्या जिल्हा अधिवेशनात उद्घाटन संघटनेच्या राज्य कोषाध्यक्ष कॉ. अर्चना घुगरे होत्या तर अध्यक्ष म्हणून माकप चे जिल्हा कमिटी सदस्य कॉ. मनिष इसाळकर हे होते.

या अधिवेशनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संघटनेच्या राज्य महासचिव कॉ. पुष्पाताई पाटील , माकपचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, कॉ. सरिता दानव हे होते.

सुरुवातीला सिटू च्या विळा हातोडा चिन्ह असलेल्या लाल झेंड्याचे ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली आणि अधिवेशनाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर श्रद्धांजली ठराव घेऊन संघटनेचा यवतमाळ जिल्ह्याचा संघटनात्मक अहवाल संघटनेच्या जिल्हा सचिव कॉ. उषा मुरखे यांनी मांडला. या अहवालावर अनेक आशा व गटप्रवर्तक प्रतिनिधींनी साधक बाधक आपली मते मांडून अहवालाला एकमताने मंजुरी देण्यात आली. त्याच सोबत पुढील तीन वर्षासाठी कृती कार्यक्रम तयार करण्यात येऊन काही महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आले.

शेवटी १७ प्रतिनिधींची नूतन जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. या मध्ये अध्यक्षपदी ॲड. कुमार मोहरमपुरी यांची तर जिल्हा सचिव पदी कॉ. उषा मुरखे यांची निवड करण्यात येऊन उपाध्यक्ष पदी कॉ. प्रीती करमनकर, आशा धोंगडे, ज्योत्स्ना फुलमाळी, सहसचिव अर्चना सावरकर, सुनिता राठोड, अर्चना चौधरी, कोषाध्यक्ष सुजाता बैस, कार्यकारिणी सदस्य चंदा मडावी, कुंदा देहारकर, लीना गाजरे, निर्मला मेश्राम, वंदना बेस, विशाखा कांबळे, छाया क्षीरसागर, संगीता डेरे यांची एकमताने निवड करण्यात आली.

अधिवेशनाचे कामकाज कॉ. उषा मुरखे यांनी तर आभार कॉ. सुजाता बैस यांनी मानले. राष्ट्र गीताने अधिवेशनाची सांगता झाली.
या अधिवेशनाचे मुख्य द्वाराला कॉ. शंकरराव दानव यांचे नाव देण्यात आले होते. अधिवेशनाला जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून संघटनेला तनमन धनाने भरीव मदत करून संघटना वाढवून संघटना वाढविण्याचा निर्धार केला.

Continue Reading

Previous: वणी तहसील परिसरातील सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी
Next: “यंग इंडिया ऑफ आंबेडकराईट मूव्हमेंट” च्या वतीने महाराष्ट्राच्या लोकप्रिय गायिका कडूबाई खरात यांचा भव्य सत्कार

Related Stories

SAVE_20260212_191015
  • यवतमाळ

देशव्यापी संप ला पाठिंबा दर्शवित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

NewWaniDiary 13/02/2026
SAVE_20251209_142131
  • यवतमाळ

शिवविवाहात महामानवांच्या विचारांचा जागर – यवतमाळ व वरोरा वासियांनी अनुभवला आदर्श शिवविवाह

NewWaniDiary 09/12/2025
SAVE_20251116_211916
  • यवतमाळ

सीटू संघटनेचा कुष्ठरोग सर्वे न करण्याचा निर्णय  

NewWaniDiary 16/11/2025
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.