▪️ बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मदतीचे आवाहन..

वणी (प्रतिनिधी): रंगारीपुरा, वणी येथील नागेशश्वर राजन देवांगन (वय ३३ वर्षे) हे खोली भाड्याने घेऊन राहत होते. दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ते घरून बाहेर पडले असून घरी परत आलेले नाहीत. नागेशचा फोन सुद्धा बंद आहे. या प्रकरणाची नोंद वणी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
नागेशश्वर देवांगन हे बांधकाम ठेकेदारीचे काम करत असून त्यांना १४ वर्षांची मुलगी व ११ वर्षांचा मुलगा आहे. घरात कोणताही वाद नसताना ते अचानक बेपत्ता झाल्याची माहिती त्यांच्या वडिलांनी दिली आहे.
बेपत्ता व्यक्ती आढळल्यास कृपया संपर्क साधावा:
📞 राजन देवांगन – 9767734281
किंवा वणी पोलीस स्टेशनमध्ये कळवावे.
