Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • ॲड. ट्विंकल गोहणे यांना गोंडवाना विद्यापीठाचे सुवर्णपदक; वणी वकील संघाकडून सत्कार
  • वणी

ॲड. ट्विंकल गोहणे यांना गोंडवाना विद्यापीठाचे सुवर्णपदक; वणी वकील संघाकडून सत्कार

NewWaniDiary 23/01/2026

वणी (प्रतिनिधी): गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या वतीने घेण्यात आलेल्या बी.ए. एल.एल.बी. परीक्षेत हिंदू कायदा या विषयात प्राविण्य प्राप्त केल्याबद्दल ॲड. ट्विंकल सुधाकर गोहणे यांना दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या तेराव्या दीक्षांत समारंभात मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

या उल्लेखनीय यशाबद्दल वणी वकील संघाच्या वतीने वणी बार रूममध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून ॲड. ट्विंकल गोहणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

कु. ट्विंकल गोहणे या वणी तालुक्यातील केसुर्ली या छोट्या गावातील शेतकरी कुटुंबातील कन्या असून लहानपणीच पित्याचे छत्र हरवले आहे. आईच्या अथक कष्टातून शिक्षण घेत त्यांनी प्रचंड जिद्द व मेहनतीने बी.ए. एल.एल.बी. चे शिक्षण पूर्ण केले. गोंडवाना विद्यापीठ स्तरावर त्यांनी हिंदू कायदा विषयात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले.

सध्या त्या वणी दिवाणी व फौजदारी न्यायालयात ॲड. अविनाश बोधाने यांच्याकडे सहायक अधिवक्ता म्हणून कार्यरत आहेत.

या प्रसंगी बोलताना वणी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. वीरेंद्र महाजन म्हणाले,

“वणी वकील संघ नवोदित व गुणवंत वकिलांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहे. ॲड. ट्विंकल गोहणे यांना सुवर्णपदक मिळाल्याने वणी बारचा मान उंचावला आहे. अशा सत्कारामुळे नवोदित वकिलांना प्रेरणा मिळते.”

यावेळी ॲड. अविनाश बोधाने व ॲड. नीलेश चौधरी यांनीही मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना ॲड. ट्विंकल गोहणे यांनी आपल्या भावना व्यक्त करत मार्गदर्शक व वकील संघाचे आभार मानले.

कार्यक्रमाचे संचालन वकील संघाचे सचिव ॲड. अमोल टोंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन ॲड. दिलीप परचाके यांनी केले.
या कार्यक्रमास वणी दिवाणी व फौजदारी न्यायालयातील महिला व पुरुष वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Continue Reading

Previous: गोरगरिबातून आलेला नेतृत्वाचा चेहरा; उपनगराध्यक्ष राकेश बुग्गेवार यांचा सत्कार
Next: बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त वणीत भव्य मॅराथॉन स्पर्धा; उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 09_31_16 PM_11zon
  • वणी

तेली फैलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह; आकर्षक रोषणाईने परिसर उजळला

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_58_51 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.