▪️मोर्चात शेतकरी,शेतमजूर, आशा स्वयंसेविका यांच्या हजारोचा संख्येत सहभाग..

वणी (प्रतिनिधी) – केंद्रसरकाने कामगारांनी प्रदीर्घ संघर्षातून मिळवलेले २९ कामगार कायदे रद्द करून ४ श्रम संहिता लागू केले. ह्या श्रमसंहिता कामगारांचा अधिकारांना डावलणारे असल्याने तसेच कामगार संघटनांशी कुठलीही चर्चा न करता लागू केल्याने देशातील सर्वच कामगार संघटना ह्याचा विरोध करीत दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी देशव्यापी संप केला. ह्या संप ला पाठिंबा देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय किसान सभा व सी आय टी यू आशा संघटन लाल बावटा यांच्या जिल्हा परिषद कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विविध मागण्यांना घेऊन भव्य मोर्चा काढण्यात आला.
कामगार विरोधी ४ नवीन श्रम संहिता रद्द करा, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा, शेतमालाचा हमी भावाचा कायदा करा, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करताना आदिवासी व गैर आदिवासी यांचे वन जमीन अतिक्रमण धारकाचे कोणत्याही दोन पुराव्याचा आधारावर दावे मंजूर करा, आशांना कर्मचारी म्हणून दर्जा देऊन त्यांना मानधन न देता वेतन द्या, आशांना दरमहा ५ तारखेला मानधन द्या, आशांना वेतन चिठ्ठी द्या, आशांची सेवानिवृत्ती ६० ऐवजी ६५ वयोमर्यादा करा, आदी व अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात आले.
हा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयापासून भव्य नारेबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आल्यावर निवेदन देऊन त्या ठिकाणी सभा घेण्यात आली.
मोर्चाचे नेतृत्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ ॲड कुमार मोहरमपुरी, किसान सभेचे रा क सदस्य कॉ ॲड दिलीप परचाके, ॲड डी बी नाईक, किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉ चंद्रशेखर सिडाम, सी आय टी यू आशा संघटनेचा जिल्हा सचिव कॉ उषा मुरखे यांनी केले.
हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी कॉ. अनिता खुनकर, कवडू चांदेकर, सुरेखा बिरकुलवार, किसन मोहूरले, संजय वालकोंडे, गजानन ताकसांडे, वंदना गेडाम, मनीष इसालकर, रमेश मिरासे, सदाशिव आत्राम, श्रीकांत तांबेकर, बाबुलाल टेकाम, संदीप सुरपाम, भीमराव आत्राम, भाऊराव टेकाम, हरीभाऊ चिकरम, सुभाष नांदेकर, अर्जुन शेडमाके, संजय कोडापे, अमोल चटप, मंगेश सरोदे, शांताबाई उरकुडे, संभा टोंगे आदींनी अथक परिश्रम घेतले.
