Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणीत भव्य गुढीपाडवा सोहळा उत्साहात साजरा
  • वणी

वणीत भव्य गुढीपाडवा सोहळा उत्साहात साजरा

NewWaniDiary 19/03/2026

वणी (प्रतिनिधी): वणी शहरातील विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन झालेल्या गुढीपाडवा उत्सव समितीमार्फत शिवतीर्थ चौक येथे भव्य गुढीपाडवा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

या प्रसंगी जय जगन्नाथ मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे अध्यक्ष संजय खाडे उपस्थित राहून पारंपरिक पद्धतीने गुढीची पूजा केली व सर्वांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती नांदो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.

यावेळी विठ्ठल रुख्माई वारकरी हरिपाठ मंडळाच्या वतीने हरिपाठ सादर करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान आयोजकांकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमप्रसंगी आयोजक समितीच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन संजय खाडे यांचा सन्मान करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम नियोजनबद्ध आणि उत्कृष्ट पद्धतीने पार पडल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमास वणी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Continue Reading

Previous: महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी निमित्त समतेच्या लढ्याला अभिवादन; यवतमाळ जिल्ह्यातील माकप कार्यकर्ते रवाना
Next: महाड चवदार तळे सत्याग्रह शिल्पाकृतीला अभिवादन

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 09_31_16 PM_11zon
  • वणी

तेली फैलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह; आकर्षक रोषणाईने परिसर उजळला

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_58_51 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.