Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • नागपूरच्या ढोल-ताशा महासोहळ्यात वणीचे ६० वादक सहभागी
  • वणी

नागपूरच्या ढोल-ताशा महासोहळ्यात वणीचे ६० वादक सहभागी

NewWaniDiary 22/08/2026

वणी (प्रतिनिधी) : जनमंथन फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘मंथन 4 युवा – नागपूर 2026’ अंतर्गत रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर भव्य ढोल-ताशा महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात तब्बल ४५०० वादक सहभागी होणार असून महाराष्ट्राच्या पारंपरिक ढोल-ताशा संस्कृतीचा दिमाखदार आविष्कार पाहायला मिळणार आहे.

या महासोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमात वणीच्या छत्रपती ढोल-ताशा पथकाचे ६० वादक सहभागी होणार आहेत. पथक प्रमुख दिपक पाऊणकर यांच्या नेतृत्वाखाली वणीचे पथक नागपूरमध्ये आपली कला सादर करणार आहे.

रविवारी सकाळी ९ वाजता होणाऱ्या या महासोहळ्यात ढोलांचा निनाद, ताशांचा गजर आणि भगव्या ध्वजांच्या दिमाखात वणीच्या वादकांचा सहभाग हे विशेष आकर्षण ठरणार आहे.

‘ढोलांचा नाद घुमणार, ताशांचा गजर होणार… आणि विदर्भाची सांस्कृतिक ताकद नागपूरच्या भूमीवर अनुभवायला मिळणार!’

Continue Reading

Previous: शिंदोला-साखरा रस्त्याची दुरवस्था; १० दिवसांत काम सुरू करण्याचा इशारा
Next: वणी शहरात ईद मिलाद-उन-नबी निमित्त भव्य रोषणाई; आनंदाचे वातावरण

Related Stories

SAVE_20261019_125459
  • वणी

‘भाऊचा दांडिया’ उत्सवात काँग्रेस नेते संजय खाडे यांचा सत्कार

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 17, 2026, 10_35_45 PM_11zon
  • वणी

वणी पोलीस ठाण्यातील अमरदीप दुर्गोत्सवाची ४२ वर्षांची परंपरा कायम

NewWaniDiary 17/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.