Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • शिंदोला-साखरा रस्त्याची दुरवस्था; १० दिवसांत काम सुरू करण्याचा इशारा
  • वणी

शिंदोला-साखरा रस्त्याची दुरवस्था; १० दिवसांत काम सुरू करण्याचा इशारा

NewWaniDiary 21/08/2026

वणी (प्रतिनिधी) : वणी उपविभागीय क्षेत्रातील शिंदोला ते साखरा रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, पांढरकवडा येथील कार्यकारी अभियंत्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंत्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन रस्त्याची पाहणी करावी, अशी मागणी करण्यात आली.

“रस्ता लगेच बनवू नका; मात्र प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी करा. यावेळी स्थानिक नागरिकांच्या हस्ते आपले अभिनंदन करू,” अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

यापूर्वी दि. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी संबंधित रस्त्याच्या दुरवस्थेबाबत निवेदन देण्यात आले होते. रस्त्याच्या कामासाठी वर्क ऑर्डर मिळूनही अनेक दिवस कामाला सुरुवात झाली नव्हती. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. या प्रश्नाची दखल विविध वृत्तपत्रांनीही घेतली होती.

मात्र, वर्षभराच्या कालावधीतच रस्त्याची पुन्हा अशी दुरवस्था होत असेल, तर या निकृष्ट कामासाठी जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दूरध्वनीवरील चर्चेदरम्यान येत्या १० दिवसांत रस्त्याच्या कामाची दखल घेऊन प्रत्यक्ष काम सुरू करावे, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली. अन्यथा जनहितार्थ आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

Continue Reading

Previous: महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी वणीतील उपासक आर्थिक मदतीसह रवाना
Next: नागपूरच्या ढोल-ताशा महासोहळ्यात वणीचे ६० वादक सहभागी

Related Stories

ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 17, 2026, 10_35_45 PM_11zon
  • वणी

वणी पोलीस ठाण्यातील अमरदीप दुर्गोत्सवाची ४२ वर्षांची परंपरा कायम

NewWaniDiary 17/10/2026
SAVE_20261017_125731
  • वणी

राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी झालेल्या गैरवर्तनाच्या निषेधार्थ वणीत काँग्रेसचा मोर्चा

NewWaniDiary 17/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.