
वणी (प्रतिनिधी) : जनमंथन फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘मंथन 4 युवा – नागपूर 2026’ अंतर्गत रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर भव्य ढोल-ताशा महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात तब्बल ४५०० वादक सहभागी होणार असून महाराष्ट्राच्या पारंपरिक ढोल-ताशा संस्कृतीचा दिमाखदार आविष्कार पाहायला मिळणार आहे.
या महासोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमात वणीच्या छत्रपती ढोल-ताशा पथकाचे ६० वादक सहभागी होणार आहेत. पथक प्रमुख दिपक पाऊणकर यांच्या नेतृत्वाखाली वणीचे पथक नागपूरमध्ये आपली कला सादर करणार आहे.
रविवारी सकाळी ९ वाजता होणाऱ्या या महासोहळ्यात ढोलांचा निनाद, ताशांचा गजर आणि भगव्या ध्वजांच्या दिमाखात वणीच्या वादकांचा सहभाग हे विशेष आकर्षण ठरणार आहे.
‘ढोलांचा नाद घुमणार, ताशांचा गजर होणार… आणि विदर्भाची सांस्कृतिक ताकद नागपूरच्या भूमीवर अनुभवायला मिळणार!’

