Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी शहरात ईद मिलाद-उन-नबी निमित्त भव्य रोषणाई; आनंदाचे वातावरण
  • वणी

वणी शहरात ईद मिलाद-उन-नबी निमित्त भव्य रोषणाई; आनंदाचे वातावरण

NewWaniDiary 25/08/2026

वणी (प्रतिनिधी) : मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण जश्ने ईद मिलाद-उन-नबी बुधवार, दि. २६ ऑगस्ट रोजी वणी शहरात उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त मुस्लिम समाजबांधवांकडून विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ईद मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने वणी शहरातील मदिना मस्जिद ते टिळक चौक, खाती चौक व मोमिनपुरा परिसरात आकर्षक व भव्य रोषणाई करण्यात आली आहे. विविध रंगांच्या विद्युत रोषणाईने परिसर उजळून निघाला असून, शहरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तसेच मुख्य चौकांसह काही ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर परिसरात नागरिकांची वर्दळ वाढली असून, ईद मिलाद-उन-नबी उत्साहात साजरा करण्यासाठी मुस्लिम समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Continue Reading

Previous: नागपूरच्या ढोल-ताशा महासोहळ्यात वणीचे ६० वादक सहभागी
Next: प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त वणीत भव्य रक्तदान शिबिर

Related Stories

SAVE_20261019_125459
  • वणी

‘भाऊचा दांडिया’ उत्सवात काँग्रेस नेते संजय खाडे यांचा सत्कार

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 17, 2026, 10_35_45 PM_11zon
  • वणी

वणी पोलीस ठाण्यातील अमरदीप दुर्गोत्सवाची ४२ वर्षांची परंपरा कायम

NewWaniDiary 17/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.