
वणी (प्रतिनिधी) : समाजातील गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले दानशूर व्यक्तिमत्त्व तथा राजकीय नेते विजयबाबू चोरडिया यांचा दि. ४ सप्टेंबर रोजी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना भारतीय संविधानाचे पुस्तक भेट देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
भारतीय संविधानाचे पुस्तक भेट दिल्यानंतर विजयबाबू चोरडिया म्हणाले, “माझ्या वाढदिवसानिमित्त मिळालेली ही सर्वात मोठी आणि अनमोल भेट आहे. संविधानाचे पुस्तक भेट दिल्याबद्दल आपण सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.”
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष सुरेशभाऊ रायपुरे, माजी शिक्षण मंडळ सदस्य (अमरावती विभाग) प्राचार्य श्रीकृष्ण सोनारखन, सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे, महादेव जाधव, दिनेश रायपुरे तसेच समस्त मित्रपरिवार उपस्थित होता.

