
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील ‘द ग्रेट पिपल्स ग्रुप’ या सामाजिक संघटनेच्या वतीने दि. १ जाने. २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वणी येथे सकाळी मानवंदना देऊन ७.३० वाजता मोफत रक्त गट तपासणी शिबीर घेण्यात आले.

तसेच सायंकाळी ६.३० वा. शुरविरांना अभिवादन आणि सन्मान समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्ते व शैक्षणिक व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वणीचे आमदार संजय देरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजय नगराळे व प्रमुख अतिथी म्हणून प्रा.पुरुषोत्तम पाटील, माजी नगराध्यक्ष करूणा कांबळे, सुरेश रायपूरे, मोरेश्वर देवतळे, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर व्याख्याते दत्ता डोहे यांनी भिमा कोरेगांव शुरविरांचा इतिहास या विषयावर व्याख्यान झाले.

आणि दिवंगत आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते सुरेश मोडक यांच्या सन्मानार्थ त्यांच्या पत्नीचा सन्मान करण्यात आला. तसेच समाजा मध्ये सामाजिक कार्यात व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती यावेळी रेखा पाटील,डॉ. स्नेहदिप मेंढे,अँड. विप्लव तेलतुंबडे,भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष. योगेश रायपुरे,शिक्षिका.करमा तेलंग,ललिता तेलतुंबडे,आशावरकर माधुरी डोंगरे,प्रवीण वनकर,डॉ.संचिता नगराळे,मंगल तेलंग,शुभम डाहुले,कपिल मेश्राम, प्रणिता खोब्रागडे इत्यादी समाजबांधवांचे मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.


या कार्यक्रमाला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी द ग्रेट पिपल्स ग्रुपचे प्रमुख सदस्य दिनेश रायपुरे, प्रीतम बागडे,शुभम कडू,प्रियदर्श देवनाथ,निखिल गट्टेवार, हर्षा दि.रायपुरे,आशिष बागडे, अजय वावरे इत्यादी पदाधिकारी व समस्यांनी परिश्रम घेतले.
