Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • यवतमाळ
  • कॉ. शंकरराव दानव यांचे प्रथम स्मृतिदिन निमित्त पालोती मेटिखेडा येथे मेळाव्याचे आयोजन..
  • यवतमाळ

कॉ. शंकरराव दानव यांचे प्रथम स्मृतिदिन निमित्त पालोती मेटिखेडा येथे मेळाव्याचे आयोजन..

NewWaniDiary 29/01/2025

वणी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील जेष्ठ नेते ज्यांनी यवतमाळ जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मुहूर्तमेढ रोवली, रोपट्याचे वृक्ष केले, कम्युनिस्ट चळवळीला वाढविण्यासाठी वयाचे ५० वर्षे दिले, कष्टकऱ्यांच्या सर्वच क्षेत्राचे कामगारांचे संघटन बांधण्याचा, त्यांचा अधिकारासाठी संघर्ष करणारा व शेवटचा क्षणापर्यंत अविरत संघर्षमय असलेले कॉ. शंकरराव दानव यांच्या पहिल्या स्मृती दिना निमित्त यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील पालोती ( मेटिखेडा ) येथे दिनांक ३१ जानेवारी २०२५ ला मेळाव्याचे आयोजन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने करण्यात आले आहे.

कॉ. शंकरराव दानव हे वयाचा १६ व्या वर्षापासूनच कम्युनिस्ट विचारसरणीशी जुळून कार्य करू लागले होते. जिल्ह्यातील कष्टकरी लोकांचा विविध विभागातील पीडित लोकांना न्याय देण्यासाठी सातत्याने संघर्ष करीत राहिले. त्यांनी त्यासाठी विविध विभागातील कष्टकरी वर्गाचे संघटन बांधण्याचा प्रयत्न करीत राहिले. शेतकरी, शेतमजूर, बांधकाम कामगार, कोळसा क्षेत्रातील कामगार, चुना उद्योगातील कामगार, रिक्षा चालक, हमाल, जिनिंग कामगार, आशा वर्कर, निराधार, नगर परिषद कामगार, अश्या अनेक कष्ट करी वर्गाचे नेतृत्व करीत त्यांना न्याय देण्याचे कार्य ते करीत राहिले.

कष्टकरी वर्गाचे कार्य व संघर्ष करीत असताना कॉ. दानव यांचे संपूर्ण जिल्हाचं त्यांची कर्मभूमी होती. त्यामुळे ते सातत्याने जनतेचा कार्यासाठी घराबाहेर असायचे. पोळ, तांडा येथे राहायचे, तिथेच जेवायचे, कधी बसस्टँड वर तर कधी एखाद्या खेड्यातील झाडाखाली रात्र काढून पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या खेड्यात जाऊन तिथे बैठका घेणे, त्यांचा समस्या जाणून घेणे, त्यासाठी संघर्ष उभा करणे असे विविध कार्य ते एकटेच करीत राहिले. असे करता करता पक्षमध्ये निष्ठेने कार्य करणारे अनेक कार्यकर्ते तयार झाले असून ते गेल्यानंतरही त्याच जोमाने, जोशाने कार्य करीत असून पक्षाला वाढविण्यासाठी अविरत कार्य करीत आहे.

मार्क्सवादी विचाराला स्वीकारून कम्युनिस्ट चळवळी सोबत एकनिष्ठ राहून कॉ. दानव रात्रंदिवस कार्य करीत राहिल्याने त्यांचा नंतर पक्षाचा विस्तार करणे व कष्टकऱ्यांना त्यांचे अधिकार मिळवून देणे हेच खऱ्या अर्थाने कॉ. शंकरराव दानव यांना श्रद्धांजली ठरणार आहे. त्यासाठी त्यांचा पहिल्या स्मृतिदिनी ज्या ठिकाणी पक्षातर्फे त्यांचा अस्थींचे विसर्जन करण्यात आले त्याच गावात त्यांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांनी स्वीकारलेले मार्क्सवादी विचाराचा दिशेने पुढे मार्गक्रमण करण्यासाठीं राळेगाव तालुक्यातील पालोती ( मेटिखेडा ) येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वतीने मेळाव्याचे आयोजन त्यांचा प्रथम स्मृतिदिनी ३१ जानेवारी २०२५ ला करण्यात आले आहे. या मेळाव्याला जास्तीत जास्त जनतेने उपस्थित राहावे व कॉ. शंकरराव दानव यांना अभिवादन करावे, असे आवाहन कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, कॉ. ॲड. दिलीप परचाके, कॉ. ॲड. डी.बी.नाईक, कॉ. देविदास मोहकर, कॉ. चंद्रशेखर सिडाम, कॉ. कवडू चांदेकर, कॉ. गजानन ताकसांडे, कॉ. मनोज काळे, कॉ. मनिष इसालकर, कॉ. अनिता खूनकर, कॉ. उषा मुरके, कॉ. प्रीती करमनकर, सदाशिव आत्राम, रामभाऊ जिद्देवार, आदींनी केले आहे.

Continue Reading

Previous: वणी येथे:मीटर रीडर कामगारांचे काम बंद आंदोलन..
Next: सुजाता थिएटर मे ‘देवा’ 🎬 ता.31 जानेवारी से

Related Stories

ChatGPT Image Jun 22, 2026, 11_43_12 AM_11zon
  • यवतमाळ

HTBT कापूस बियाण्यावरील बंदीविरोधात शेतकरी संघटनेचे आंदोलन; खडकी येथे प्रतिबंधित बियाण्याची प्रतिकात्मक लागवड

NewWaniDiary 22/06/2026
SAVE_20260320_214752
  • यवतमाळ

महाड चवदार तळे सत्याग्रह शिल्पाकृतीला अभिवादन

NewWaniDiary 20/03/2026
SAVE_20260212_191015
  • यवतमाळ

देशव्यापी संप ला पाठिंबा दर्शवित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

NewWaniDiary 13/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.