Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • प्रभाग क्रमांक ५ मध्ये उमेदवारांच्या नावांवर वेगाने चर्चा; मतदारांचे लक्ष कार्यक्षम नेतृत्वावर
  • वणी

प्रभाग क्रमांक ५ मध्ये उमेदवारांच्या नावांवर वेगाने चर्चा; मतदारांचे लक्ष कार्यक्षम नेतृत्वावर

NewWaniDiary 05/11/2025

वणी (प्रतिनिधी): वणी नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ५ मधील पुरुषांच्या आरक्षित जागेसाठी अनेकांची नावे चर्चेत असून २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध समाजघटकांमधील कार्यकर्ते, धार्मिक मंडळांचे पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले तरुण आणि मागील निवडणुकांतील अपक्ष उमेदवार पुन्हा रिंगणात उतरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

कपिल मेश्राम — सामाजिक कार्यपद्धतीमुळे वाढते आकर्षण

भीम नगर येथील सामाजिक कार्यकर्ते कपिल मेश्राम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात अनेक छोटे छोटे कार्यक्रम राबविले असून वार्डातील समस्या प्रामाणिकपणे प्रशासनापर्यंत नेल्याने त्यांचे नाव मतदारांमध्ये चर्चेत आहे.

विलास भीमलवार — धार्मिक आणि राजकीय सक्रियता

पोश्ववातली देवस्थानचे अध्यक्ष विलास भीमलवार हे धार्मिक सण-उत्सवांमध्ये सक्रिय आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांचे भूत सांभाळण्याचे काम त्यांनी केल्याचे स्थानिकांमध्ये बोलले जाते. रवी बंडलवार व अन्य मित्रांसोबत त्यांची राजकीय चळवळ वेगात असून भाजपाच्या उमेदवारीची मागणी होत आहे. ते रा. दामले फैल येथील आहेत.

गौतम जीवने — आंबेडकरी समाजातील प्रभाव

आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते व आम्रपाली बुद्धविहाराचे अध्यक्ष गौतम जीवने यांनी समाजातील अनेक रॅली व उपक्रमांचे भव्य आयोजन केले आहे. रा. दामले नगरमध्ये त्यांचा प्रभाव असून तेही निवडणुकीसाठी पूर्ण तयारीत असल्याची माहिती मिळते.

संदीप खोब्रागडे — पुन्हा रिंगणात?

दामले फैल येथील संदीप खोब्रागडे हे देखील रिंगणात उतरणार अशी चर्चा असून ते पक्षाकडून किंवा अपक्ष म्हणून राहणार, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. २०१६ मधील निवडणुकीत ते मैदानात उतरले होते. त्या वेळी छोटू निमकर हे देखील अपक्ष उभे राहून विजयी झाले होते.

ॲड. रामेश्वर लोणारे — नव्या समीकरणांची शक्यता

भीम नगर येथील ॲड. रामेश्वर लोणारे यांचे नावही या निवडणुकीत पुढे येत आहे. मागील निवडणुकीत त्यांच्या पत्नी महिला राखीव गटातून विजयी झाल्या होत्या. ते कोणत्या पक्षाकडून रिंगणात उतरणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मतदारांचा प्रश्न — समाजकार्य करणारा उमेदवार कोण?

प्रभाग क्रमांक ५ मध्ये काही दिवसांत आणखी नवीन नावे समोर येण्याची शक्यता आहे. परंतु मतदारांचे लक्ष मात्र एका मुद्द्यावर केंद्रीत झाले आहे—

वार्डातील समस्या जाणून, समाजकार्यात सक्रिय आणि विकासकामांसाठी प्रामाणिक प्रयत्न करणारा उमेदवार कोण?

काही उमेदवार समाजकार्यापासून दूर राहून अवैध धंद्यांत सहभागी असल्याच्या चर्चा स्थानीकांमध्ये सुरू आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदार अधिक सजगपणे आपला प्रतिनिधी निवडतील, अशी चिन्हे दिसत आहेत.

Continue Reading

Previous: मारेगाव पोलीस ठाण्यातील अपहरण प्रकरणाचा उलगडा; तीन अल्पवयीनांची सुटका – आरोपी अटक
Next: लालगुड्यात भीषण अपघातात ट्रक चालक फरार; अपघाताला सहा दिवस उलटूनही तपास ठप्प

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 1, 2026, 05_25_56 PM_11zon
  • वणी

संजय खाडेंनी लावून धरला प्रश्न; वणी–उकणी बससेवा अखेर सुरू

NewWaniDiary 01/09/2026
ChatGPT Image Aug 27, 2026, 03_28_47 PM_11zon
  • वणी

जम्मू खान यांचा सेवाभावी उपक्रम; ४१ गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलींचे वाटप

NewWaniDiary 27/08/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.