▪️ नगर परिषदेत लाखोंचा महसूल बुडाल्याचा आरोप..


वणी : वणी नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सचिन गाडे यांच्या विरोधात माजी नगराध्यक्ष पांडूरंग के. टोंगे यांनी गंभीर स्वरूपाच्या तक्रारींचे निवेदन दि. ७ जुलै २०२५ रोजी; जिल्हाधिकारी, प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन, अमरावती, तसेच नगर विकास मंत्रालयाकडे सादर केले आहे.
या निवेदनात त्यांनी मुख्याधिकाऱ्यांची कार्यशैली, प्रशासनातील निष्काळजीपणा, आर्थिक नुकसान, भ्रष्टाचाराचे आरोप, वसूलीची दुर्लक्ष, तसेच शहरातील दलित वस्ती अंतर्गत विविध प्रलंबित विकास कामांबाबत बेफिकिरी यांचा उल्लेख करत कार्यवाहीची मागणी केली आहे.

निवेदनातील महत्त्वाचे मुद्दे:
- यात्रा मैदानातील भाडे व मालमत्ता कर वसूल न करणे.
- गांधी चौक व शहरातील व्यापारी जागांची लीज नोंदणी प्रक्रियेत अनियमितता.
- ग्रीन ट्रिब्युनलच्या आदेशांची अंमलबजावणी न करून नगर परिषदेच्या महसुलाला नुकसान.
- डी.पी. रोडसाठी निधी असूनही काम न होणे.
- बिअर बार व देशी दारु दुकानांकडून कर वसुलीचा मुद्दा.
- सात संडास व मटन मार्केटसारख्या कामांवर खर्च करूनही ते वापरात न आणणे.
- अशोक सिमेंट, टोल वसुली, तसेच इतर मालमत्तांवरील कर वसूल न होणे.
- अतिक्रमणावर नियंत्रणाचा अभाव आणि जागा विक्रीसंबंधी गंभीर आरोप.
- टेंडर प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव व आर्थिक अनियमितता.
- कर्मचाऱ्यांना नियमबाह्य आरोग्य भत्त्याचे वाटप.
यासह अनेक मुद्द्यांवर माजी नगराध्यक्ष टोंगे यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप करत, संबंधित विभागांनी मुख्याधिकाऱ्यांच्या मानसिक आरोग्याची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्याविरुद्ध चौकशी करण्याची व आर्थिक नुकसानाची वसुली करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री, प्रधान सचिव यांच्याकडेही पाठवण्यात आली आहे.
