Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चळवळ
  • यवतमाळ येथे:आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या उपस्थितीमध्ये युगात्मा शरद जोशी यांचा स्मुतिदिवस साजरा
  • चळवळ
  • यवतमाळ

यवतमाळ येथे:आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या उपस्थितीमध्ये युगात्मा शरद जोशी यांचा स्मुतिदिवस साजरा

NewWaniDiary 15/12/2024


दि. १२ डिसेंबर २०२४ रोजी बोध बोडन शिवारामध्य तारासिंग राठोड यांच्या शेतामध्ये युगात्मा शरद जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी यवतमाळ विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी हजेरी लावून. शेतकरी समस्येवर चर्चा करून आश्वासित केले, की ज्या काही समस्या आहे. त्यासाठी माझ्या परीने शासनदरबारी माडण्याचा सदैव प्रयत्न करील व शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या सोबत राहील.

यावेळी नवीन तंत्रज्ञानाचे कपाशीचे प्लॉट शिवार फेरी करून पाहिले आणि सर्व माहिती करून घेतली. आणि कृषी व तंत्रज्ञान आघाडी सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.दि. १२ डिसेंबर रोजी शेतकरी संघटनेचा युगात्मा शरद जोशी यांचा स्मृतिदिन
कार्यक्रम बोध बोडन यवतमाळ येथे तारासिंग राठोड यांच्या शेतात सपन्न झाला.
मेळाव्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. तंत्रज्ञान व बाजारपेठेच्या संदर्भात तंत्रज्ञान प्रमुख मिलिंद दामले,विजय निवल,दीपक अण्णा आनंदवार यांनी मत व्यक्त केले. उत्पादन खर्च कमी केल्याशिवाय जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय शेतकऱ्यांची स्थान शिल्लक राहणार नाही.

याबाबतीत एक मत झाली असून. आयटी सेक्टर व शेतीमध्ये जर तंत्रज्ञान आलं तर आयटी सेक्टर सारखंच शेती क्षेत्रात जगावर राज्य करण्याची ताकद इथल्या .हवामानामध्ये आणि शेतीमध्ये उपलब्ध असलेल्या युवा शेती करत असल्यामुळे या क्षेत्राकडून चांगली अपेक्षा करता येत असून. विदेशी चलन निर्माण करण्याची कुवत फक्त शेती क्षेत्रामध्ये आहे. त्यासाठी अत्याधुनिक जेनेटिक मॉडिफाइड सीड चा वापर भारतच्या शेतीमध्ये झाला आणि उत्पादन खर्च कमी करू शकलो तर जागतिक बाजारांमधील सगळ्यात मोठा हिस्सा भारतीय शेती उत्पादन राहील. आणि विदेशी चलन भारताकडे येईल. ज्या राज्याचा उत्पादन खर्च जास्त आहे त्या राज्यातील शेतकऱ्यांचा एमएसपी मुळे तोटा होत आहे असं मत मिलिंद दामले यांनी मांडले. उत्पादन जास्त खर्च जास्त असल्यामुळे वारंवार शेतकरी सरकारकडे जास्त भावाची मागणी करत आहे,असं मत अशोक भुतडा यांनी मानले. तर जोपर्यंत शेतीमालावर प्रक्रिया होणार नाही तोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही हे मत सिकंदर शहा शेतकरी वारकरी संघटनेने मांडले. शरद जोशी च्या काळात आंदोलनाची ताकद असणारी शेतकरी संघटना आज प्रत्येक पक्षाच्या व्यासपीठावर आपली विचाराची बाजू मांडून त्या पक्षाला दिशा देण्याचे काम व्यक्त करेल असं मत मांडल्या मुळे,आजच्या या कार्यक्रमात् मध्ये यवतमाळ विधानसभेचे आमदार बाळासाहेब मांगुळकर ऊपस्थीत होते . त्यांनी शेतकरी संघटनेच्या कामात सहभाग करण्याचे व हा विषय समोर नेण्याचे मान्य केले.पुढील काळात राजकीय पक्षाला दिशा देण्याचे काम शेतकरी संघटना करेल असे शरद जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त एकंदरीत सूर निघाला.

यावेळी नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब मागुळकर यांचा शेतकरी सघटनेचे जिल्हध्यक्ष यांनी सत्कार केला कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य अकोला बाजारचे संजय शिंदे, गुणवंत डोळे, बाबा कपिले, मनोज पाचघरे जयंत बापट,भारतीय किसान संघ, शेतकरी वारकरी संघटना व शेतकरी संघटनेचे अनेक पदाधिकारी कार्यक्रमात उपस्थित होते. आणि पिक पाहणी आणि शिवार फेरी कार्यक्रम आटपून शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी करून घेतली. यावेळी भास्करराव महाजन हिम्मतराव देशमुख, देवेंद्र राऊत, चद्रशेखर देशमुख विदर्भ राज्यआंदोलन समिती चे जील्हाध्यक्ष कृष्णराव भोगांडे,मधुसुदन कोवे, अशोक कपीले, दिवाकर भोयर,अमोल मेहर,तुकाराम सहारे, राजश्रीताई झोटींग, रेखाताई निवल, यांची उपस्थित होती

Continue Reading

Previous: वणी विधानसभा मतदारसंघातील गाव तिथे भाकपच्या शाखा स्थापुन येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढविणार -काॅ.अनिल हेपट
Next: रायपूर येथील पाण्याच्या टॉकीवर महिलेच्या “शोले” आंदोलनाची आ. संजय देरकरांच्या पुढाकारातून सांगताhttps://newwanidiary.com/womens-shole-movement-on-water-talkie-it-is-said-through-the-initiative-of-sanjay-derkar/

Related Stories

ChatGPT Image Jun 22, 2026, 11_43_12 AM_11zon
  • यवतमाळ

HTBT कापूस बियाण्यावरील बंदीविरोधात शेतकरी संघटनेचे आंदोलन; खडकी येथे प्रतिबंधित बियाण्याची प्रतिकात्मक लागवड

NewWaniDiary 22/06/2026
SAVE_20260320_214752
  • यवतमाळ

महाड चवदार तळे सत्याग्रह शिल्पाकृतीला अभिवादन

NewWaniDiary 20/03/2026
SAVE_20260212_191015
  • यवतमाळ

देशव्यापी संप ला पाठिंबा दर्शवित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

NewWaniDiary 13/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.