
वणी – मुकुटबन येथे RCCPL MP Birla सिमेंट कंपनीतील कामगारांच्या विविध प्रलंबित समस्यांबाबत योग्य तो निर्णय न घेणाऱ्या कंपनी प्रशासनाविरोधात आज 6 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे पाच वाजेपासून कामगारांकडून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व कंपनीत स्थापन असलेल्या जनरल इंडस्ट्रीज कामगार युनियन (आयटक) चे अध्यक्ष तथा वणी विधानसभा क्षेत्रातील प्रखर व लढाऊ नेतृत्व कॉ. अनिल हेपट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. कामगारांनी या आंदोलनाला १००% प्रतिसाद देत एकजूट दाखवली.
कामगारांनी कंपनी प्रशासनाला दिलेल्या अल्टिमेटममध्ये प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे—
- किमान वेतन कायद्यानुसार योग्य वेतन अंमलात आणावे
- कामगार संहितेनुसार कामाचे तास निश्चित करावेत
- कार्यस्थळावरील वातावरण, सुरक्षा आणि सुविधा सुधाराव्यात
- तसेच इतर काही प्रलंबित मागण्यांचा तातडीने विचार करावा
आंदोलनाचे नेतृत्व कॉ. अनिल हेपट यांच्यासह पुढील कार्यकर्त्यांच्या सहभागातून होत आहे—
अनिल घाटे, मोरेश्वर कुंटलवार, दिनेश शिटलवार, पंढरी नांदेकर, प्रविण कुळेकर, अनिल मोंडे, महादेव मेश्राम, कवडु केळझरकर, रोषण चामाटे, कलीम शेख, निरज खैरकर, अक्षय पुल्लीवार आदी.
कामगारांच्या न्याय्य मागण्यांचा सकारात्मक तोडगा काढण्यासाठी कंपनी प्रशासनाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी सर्वांची एकमुखी मागणी आहे.
