
वणी (प्रतिनिधी) – वणी तालुक्यातील उकणी, निलजई, पिंपळगाव, बोरगाव व जुनाडा परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, प्रलंबित जमीन संपादन, शेतीतील नुकसानीची भरपाई व शाळकरी मुलांसाठी बससेवा या मागण्यांसाठी नागरिकांनी संतप्त भूमिका घेतली आहे. यासाठी २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून उकणी खाण रोडवरील बस स्थानक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय खाडे करीत असून शासनाने तातडीने मागण्या मान्य न केल्यास संघर्ष उग्र होईल, असा इशारा देण्यात आला आहे.