Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • पर्यावरण संवर्धन आणि स्वदेशीचा संदेश देण्यासाठी भाजपकडून ‘बाप्पा माझा स्पर्धाचे आयोजन
  • वणी

पर्यावरण संवर्धन आणि स्वदेशीचा संदेश देण्यासाठी भाजपकडून ‘बाप्पा माझा स्पर्धाचे आयोजन

NewWaniDiary 13/09/2026

वणी (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन तसेच स्वदेशी वस्तूंच्या वापराबाबत जनजागृती व्हावी आणि गणेशोत्सव अधिक सुंदर, पर्यावरणपूरक व सामाजिक संदेश देणारा ठरावा, या उद्देशाने भारतीय जनता पार्टी, वणी शहर यांच्या वतीने ‘बाप्पा माझा स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत ‘अ’ गटात घरगुती गणपती, तर ‘ब’ गटात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येणार आहे. दोन्ही गटांमध्ये स्वदेशी वस्तूंचा वापर किंवा पर्यावरण संवर्धन या दोन विषयांपैकी एका विषयावर आकर्षक देखावा सादर करणे आवश्यक आहे.

दोन्ही गटांसाठी प्रथम क्रमांकास ₹५ हजार व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकास ₹३ हजार व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकास ₹२ हजार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

स्पर्धकांनी १६ सप्टेंबर २०२६ पर्यंत दिलेल्या संपर्क क्रमांकावर नोंदणी करून व्हॉट्सॲपद्वारे आपल्या देखाव्याचा फोटो पाठवायचा आहे. त्यानंतर १७ ते २३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजक व परीक्षकांकडून प्रत्यक्ष घरी अथवा गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन देखाव्याचे परीक्षण करण्यात येणार आहे.

ही स्पर्धा वणी शहर व लगतच्या गावांपुरती मर्यादित राहणार असून, घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव या दोन्ही गटांतील निवड झालेल्या प्रत्येकी २० नोंदणींचे परीक्षण करण्यात येणार आहे. नोंदणी करताना घराचा अथवा गणेशोत्सव मंडळाचा संपूर्ण पत्ता तसेच मोबाईल क्रमांक आयोजकांकडे व्हॉट्सॲपद्वारे देणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी शक्यतो सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत व्हॉट्सॲप अथवा फोनद्वारे संपर्क साधावा. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.

या उपक्रमात वणी शहरातील नागरिक, गणेशभक्त तसेच गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरण संवर्धन आणि स्वदेशीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि ॲड. निलेश चौधरी, शहर अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी वणी यांनी केले आहे.

स्पर्धेचे संयोजक मनोज सरमुकदम असून सहसंयोजक गणेश आसूटकर, श्री. बालाजी भेदोडकर, उमेश गंधारे, डॉ. नीलिमा दवणे, वैशाली वातिले, आरती गणेश वांढरे, संगीता मेश्राम, प्रिती बिडकर आणि पूजा रामगिरवार आहेत.

इच्छुकांनी पोस्टरवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Continue Reading

Previous: वणी शहरात; शुभेच्छा फलकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेच्या मांडणीवरून नाराजी
Next: वणी बसस्थानकातील स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेमुळे प्रवाशांत नाराजी

Related Stories

ChatGPT Image Oct 19, 2026, 09_57_08 AM_11zon
  • वणी

चिखलगावात आदिशक्ती दुर्गोत्सव मंडळाची भुतिया गुफा आकर्षणाचे केंद्र

NewWaniDiary 19/10/2026
ChatGPT Image Oct 17, 2026, 10_35_45 PM_11zon
  • वणी

वणी पोलीस ठाण्यातील अमरदीप दुर्गोत्सवाची ४२ वर्षांची परंपरा कायम

NewWaniDiary 17/10/2026
SAVE_20261017_125731
  • वणी

राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्याशी झालेल्या गैरवर्तनाच्या निषेधार्थ वणीत काँग्रेसचा मोर्चा

NewWaniDiary 17/10/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.