▪️संजय खाडे यांचा आंदोलनाला पाठिंबा..

वणी, दि. ७ ऑगस्ट – वणी तालुक्यातील कळमना (खु) येथील कार्तिकेय कोल वॉशरीज प्रा. लि. कंपनीतील कामगार १८ दिवसांचे काम व वेतन न मिळाल्याने तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत. कामगारांच्या मागण्या रास्त असून, कंपनीकडून कोणतीही सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर आज संजय खाडे यांनी सहकाऱ्यांसह उपोषण मंडपाला भेट देऊन कामगारांशी चर्चा केली. त्यांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवित सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या वेळी कामगारांच्या हक्कांसाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
कामगारांनी तातडीने वेतन व काम देण्याची मागणी केली असून, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे सांगितले.
