Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • जि. प. उच्च प्राथमिक सेमी इंग्रजी डिजिटल शाळा, चिखलगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीची सभा संपन्न
  • वणी

जि. प. उच्च प्राथमिक सेमी इंग्रजी डिजिटल शाळा, चिखलगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीची सभा संपन्न

NewWaniDiary 19/07/2026

वणी (प्रतिनिधी): दि. १६ जुलै २०२६ रोजी जि. प. उच्च प्राथमिक सेमी इंग्रजी डिजिटल शाळा, चिखलगाव येथे शाळेच्या सर्वांगीण विकासासंदर्भात विविध विषयांवर शाळा व्यवस्थापन समितीची सभा अध्यक्षा अश्विनी धारणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.

सभेस शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष प्रमोद गौरकार, शिक्षणतज्ज्ञ चंद्रशेखर देठे, ग्रामपंचायत सदस्या तथा शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सीमा देवाळकर, सदस्य जयंत उर्फ जितू कोहळे, सदस्या पल्लवी मोरे, पूजा नेहारे, चिखलगाव केंद्राचे केंद्र समन्वयक संदीप ठाकरे, मुख्याध्यापिका प्रतिमा राखुंडे, सहाय्यक शिक्षिका अर्चना बोढे, सविता वरपटकर तसेच संगणक प्रशिक्षक वैष्णवी कुत्तरमारे उपस्थित होते.

यावेळी नवनियुक्त केंद्र समन्वयक संदीप ठाकरे, स्वयंसेवक सोनाली आवारी व संध्या जाधव यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित सदस्य जयंत उर्फ जितू कोहळे यांचेही स्वागत करण्यात आले.

मूल्यवर्धन तासिकेच्या पाहणीसाठी आलेल्या तालुका समन्वयक करूणा खैरे यांचाही समितीतर्फे सत्कार करण्यात आला. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समिती व केंद्र समन्वयक संदीप ठाकरे यांनी सर्व वर्गांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी SIR कामाच्या पाहणीसाठी आलेले वणी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर यांचेही शाळा व्यवस्थापन समितीतर्फे स्वागत करण्यात आले.

सभेमध्ये शाळेच्या विकासासंदर्भातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी चिखलगाव रेल्वे गेट परिसरातील उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या बांधकाम कंपनीला शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Continue Reading

Previous: वणीतील वाढती उष्णता : विकास झाला; पण सावली कुठे?
Next: दामले फैल परिसरात मच्छरनाशक फवारणी; सार्वजनिक शौचालय दुरुस्तीचे काम दिवाळीत सुरू होणार

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 09_31_16 PM_11zon
  • वणी

तेली फैलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह; आकर्षक रोषणाईने परिसर उजळला

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_58_51 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.