Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • वणी प्रभाग ६ मध्ये: माजी पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांची नावे चर्चेत
  • वणी
  • राजकीय

वणी प्रभाग ६ मध्ये: माजी पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांची नावे चर्चेत

NewWaniDiary 08/11/2025

वणी (प्रतिनिधी): वणी नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ६ मध्ये संभाव्य उमेदवारांबाबत स्थानिक स्तरावर चर्चा रंगू लागली आहे. हा प्रभाग अनुसूचित जाती (SC) महिला आरक्षित असून, या आरक्षित गटातून माजी नगराध्यक्षा करुणा रवींद्र कांबळे (रा. वासेकर लेआउट) आणि धम्माताई हरीश पाते यांची नावे नागरिकांमध्ये चर्चेत असल्याची माहिती मिळते.

दरम्यान, प्रभाग ६ च्या सर्वसाधारण महिला-पुरुष गटातूनही काही नावांची अनौपचारिक चर्चा सुरू आहे. त्यामध्ये माजी नगरसेवक प्रमोद लोणारे (रा. नगर वाचनालय मागे) आणि सामाजिक कार्यकर्ते रज्जत सातपुते (रा. सम्राट अशोक नगर) यांचा समावेश असल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले. याशिवाय इतर काही महिला-पुरुषांची नावेही चर्चेत आहेत; मात्र कोणत्याही नावाची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

२ डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने प्रभागात उमेदवारांच्या घोषणांपूर्वीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. नागरिकांचा प्रतिसाद आणि उमेदवारांच्या संभाव्य यादीविषयीची उत्सुकता यामुळे स्थानिक राजकीय वातावरण अधिक रंगतदार झाले आहे.

दरम्यान, आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटनांकडून आवाहने केली जात आहेत. तसेच, आगामी निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून रणनीती आखण्याच्या हालचाली सुरू असल्याचेदेखील दिसून येत आहे.

Continue Reading

Previous: वणी नगर परिषद निवडणूक : प्रभाग ५ महिला आरक्षित; संभाव्य नावांवर चर्चा
Next: विजया गार्डन परिसरात मृतदेह आढळून खळबळ

Related Stories

SAVE_20260226_131159_11zon
  • वणी
  • घोन्सा

आदर्श हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, घोन्सा येथे माजी विद्यार्थी स्नेहमिलन उत्साहात

NewWaniDiary 26/02/2026
SAVE_20260225_203542_11zon
  • वणी

वनाधिकार कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणी साठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेने केले आंदोलन

NewWaniDiary 25/02/2026
SAVE_20260223_232242-1024x678.jpg
  • महाराष्ट्र
  • वणी

रायगड किल्ला येथे स्वच्छता अभियान; शिवसैनिकांकडून दोन महापुरुषांना मानवंदना

NewWaniDiary 23/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.