Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चळवळ
  • भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन
  • वणी
  • चळवळ

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन

NewWaniDiary 31/12/2024

भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील ‘द ग्रेट पिपल्स ग्रुप’ या सामाजिक संघटनेच्या  दि. १ जाने. २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वणी येथे सकाळी  ७.३० वाजता मोफत रक्त गट तपासणी शिबीर व सायंकाळी ६.३० वा. शुरविरांना अभिवादन आणि सन्मान समारंभ कार्यक्रमाचे आजोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्ते व शैक्षणिक व्यक्तींचा सन्मान होणार आहे. या कार्यक्रमाचे उ‌द्घाटक म्हणून वणीचे आमदार संजय देरकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजय नगराळे व प्रमुख अतिथी म्हणून गणेश किंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी, वणी  मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न होत आहे.
व्याख्याते  दत्ता डोहे यांचे व्याख्यान भिमा कोरेगांव शुरविरांचा इतिहास या विषयावर होणार आहे.

यावेळी  पुरूषोत्तम पाटील,मोरेश्वर देवतळे, सुरेश रायपुरे, करूणा कांबळे, ईजहार शेख, संबा वाघमारे इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

तरी कृपया या कार्यक्रमास आपण आवर्जुन उपस्थित रहावे असे आवाहन द ग्रेट पिपल्स ग्रुप वणी च्या वतीने आयोजकांनी केली आहे.

Continue Reading

Previous: जग ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर उभं
Next: क्रातिज्योती सावित्रीबाई फुले यांना द ग्रेट पिपल्स ग्रुपच्या वतीने अभिवादन

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.