Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • यवतमाळ
  • यृगात्मा शरद जोशी यांच्या स्मुतिदिनानीमीत्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन
  • यवतमाळ

यृगात्मा शरद जोशी यांच्या स्मुतिदिनानीमीत्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन

NewWaniDiary 10/12/2024

शेतकरी संघटना आयोजित युगात्मा शरद जोशी यांचा स्मृतिदिन दिनांक 12 डिसेंबरला बोध बोडण(अर्जुना)येथे आयोजित करण्यात आले. या आयोजित मेळाव्यात जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते हजर राहणार असून त्या त्यानिमित्त कपाशी मधील नवीन तंत्रज्ञानाची व प्रत्यक्ष प्लॉट पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. ह्या मेळाव्याचे आयोजन जिल्हा शेतकरी संघटना करणार असून. भारतातील शेती जागतिक स्पर्धेसाठी तयार करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. जागतिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचे माहिती मिळण्याच्या दृष्टीने व जमीन, पाणी, हवामान अभ्यास सत्राचे आयोजित करण्यात आली आहे. शिवार फेरीचे आयोजन यावेळी केले आहेत.

देशातील आणि राज्यातील सरकारांना या मार्गदर्शनाच्या दृष्टीने उपयोग होणार असून भारतीय शेतकरी स्पर्धात्मक युगात कसा तयारी करेल याची नियोजन करण्यात येणार असून. हा मेळावा शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन ठरेल असे वक्तव्य जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष राजेंद्र झोटिंग यांनी मत व्यक्त केले. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने प्रसिद्ध वक्ते मिलिंद दामले, विजय निवल, मनीष जाधव, सिकंदर शहा, हे उपस्थित राहणार आहे.

या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे. असे आव्हान शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले. मेळाव्याचे आयोजन दि 12 डिसेंबरला दु. 12 वाजता बोध बोडण अर्जुना ता. यवतमाळ येथे तारासिंग राठोड यांच्या शेतात होत आहे, तरी यवतमाळ जिल्हातील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्तानी उपस्थित राहावे असे आव्हान यवतमाळ जिल्हा शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष सोनाली मरगडे युवा आघाडी अध्यक्ष अक्षय महाजन यांनी केले आहे.

Continue Reading

Previous: भ्रष्टाचाराचा फटका सहन करून संघर्षमय जीवन
Next: मारेगाव येथे: कम्युनिस्ट पक्षाच्या वतिने देशव्यापी आंदोलन

Related Stories

ChatGPT Image Jun 22, 2026, 11_43_12 AM_11zon
  • यवतमाळ

HTBT कापूस बियाण्यावरील बंदीविरोधात शेतकरी संघटनेचे आंदोलन; खडकी येथे प्रतिबंधित बियाण्याची प्रतिकात्मक लागवड

NewWaniDiary 22/06/2026
SAVE_20260320_214752
  • यवतमाळ

महाड चवदार तळे सत्याग्रह शिल्पाकृतीला अभिवादन

NewWaniDiary 20/03/2026
SAVE_20260212_191015
  • यवतमाळ

देशव्यापी संप ला पाठिंबा दर्शवित मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

NewWaniDiary 13/02/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.