▪️निवडणुकीत उमेदवार गोरगरिबांच्या मदतीचे आश्वासन देतात, मात्र निवडणुका झाल्यानंतर या जनतेकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे चित्र स्पष्ट..

वणी : दि. २६ मे रोजी, वणी ग्रामीण रुग्णालयात एक महिन्यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या ट्रामा केअर युनिटमध्ये सकाळपासून दोन तासांपासून वीज नसल्याने रुग्ण, डॉक्टर, कर्मचारी व रुग्णांच्या नातेवाईकांना उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, या रुग्णालयात अद्याप सुविधा उपलब्ध नाही.
यामुळे गंभीर जखमी, रक्तबंबाळ रुग्णांवर वेळेवर उपचार न होऊ शकल्याने त्यांना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर करावे लागत आहे. ही बाब गंभीर असून, वैद्यकीय सुविधांचा अभाव आता जिवावर बेतणाऱ्या स्थितीत पोहोचला आहे.
विधानसभा निवडणुकीत उमेदवार गोरगरिबांच्या मदतीचे आश्वासन देतात, मात्र निवडणुका झाल्यानंतर या जनतेकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
वणी ग्रामीण रुग्णालय हे यवतमाळ जिल्ह्यासह राज्यभरातून येणाऱ्या रुग्णांसाठी महत्वाचे केंद्र असूनदेखील, अद्याप उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला नाही. अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे हे स्वप्न अपूर्णच राहिले आहे.
सामाजिक कार्यकर्ते नारायण गोडे आणि इतर नागरिकांनी या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त करत, स्थानिक आमदार आणि संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध कराव्यात, अशी जोरदार मागणी केली आहे.
ट्रामा केअर सुरू असूनही रुग्णांचे हाल होत असून नारायण गोडे यांची प्रतिक्रिया..
