
वणी (प्रतिनिधी) : बिहारमधील बोधगया येथे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू असून, या आंदोलनाला भेट देऊन आर्थिक मदतीसह सहकार्य करण्यासाठी वणीतील उपासक आज, शुक्रवार दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, वणी येथून आंदोलनस्थळी रवाना झाले.
विजय नगराळे मित्र परिवारातील उपासकांना आंदोलनासाठी रवाना होण्यापूर्वी माजी नगराध्यक्ष सुरेश रायपूरे यांनी हार घालून व ‘जय भीम’ म्हणत स्वागत केले. यावेळी सोनारखंन सर यांनी प्रास्ताविक केले. तर प्रा. पुरुषोत्तम पाटील सर यांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची पार्श्वभूमी व संपूर्ण रूपरेषा उपस्थितांना समजावून सांगितली.
प्रा. पुरुषोत्तम पाटील, जीवने साहेब आणि सुरेश रायपूरे यांच्या उपस्थितीत पंचशील ध्वज दाखवून आंदोलनासाठी रवाना होणाऱ्या उपासकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या आंदोलनासाठी वणीहून विजय नगराळे, संजय तेलंग, किशोर चहांदे, भारत कुंभारे, अनिल थूल आणि रवी कनाके सहभागी झाले आहेत. आंदोलनाला आर्थिक मदत व सहकार्य देण्याच्या उद्देशाने हे उपासक बोधगया येथे रवाना झाले आहेत.
महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन यशस्वी व्हावे, यासाठी समाजबांधवांनी आंदोलनकर्त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

