Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • एकता नगर गेट परिसर अंधारात; स्ट्रीट लाईट, सीसीटीव्ही व स्पीड ब्रेकर नसल्याने नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर
  • वणी

एकता नगर गेट परिसर अंधारात; स्ट्रीट लाईट, सीसीटीव्ही व स्पीड ब्रेकर नसल्याने नागरिक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

NewWaniDiary 18/12/2025

वणी (प्रतिनिधी): वणी शहरातील वरोरा रोडवरील एकता नगर गेटजवळील परिसरात स्ट्रीट लाईटची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे नागरिक, विशेषतः युवती व क्लासेसला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी या परिसर अंधार राहात असल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेले सीसीटीव्ही कॅमेरेही नसल्याने असामाजिक तत्वांकडून गैरप्रकार होण्याची शक्यता वाढली आहे. स्ट्रीट लाईट व स्पीड ब्रेकर नसल्यामुळे या मार्गावरून वाहने अति वेगाने धावत असून, काही दिवसांपूर्वी तरुणांमध्ये मारामारीच्या घटनाही घडल्या आहेत, त्यामुळे परिसरातील पालक व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सदर मार्गावर सकाळच्या वेळेत शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असते. तसेच एकता नगर गेटजवळच उपविभागीय अधिकारी यांचे निवासस्थान असल्याने, प्रकाशाअभावी रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता अधिकच वाढली आहे. विशेष म्हणजे एकता नगर गेटपासून शांती कॉम्प्लेक्सपर्यंत एकही स्ट्रीट लाईट नसल्याचे चित्र दिसून येते.

या परिसरातून माजी आमदार बोदकुरवार यांच्या निवासस्थानाकडे जाणारा मार्ग जात असून, खरेदी व खाद्यपदार्थांसाठी काही नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे या रस्त्यावर दिवसभर मोठी वर्दळ असते.

या परिसरात अंधाराचा फायदा घेऊन अनेक घटना घडल्या आहे. या पुढे काही अनुसूचित घटना घडू नये या साठी प्रशासन सावध भूमिका घेऊन पूर्ण सोई सुविधा उपलब्ध करावी नागरिकांची मागणी आहे.

या सर्व बाबी लक्षात घेता, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने स्ट्रीट लाईट, सीसीटीव्ही कॅमेरे व स्पीड ब्रेकरची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी विद्यार्थी, पालक वर्ग व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Continue Reading

Previous: डॉ. संचिता विजय नगराळे यांचा वाढदिवस स्नेहपूर्ण वातावरणात साजरा; केक कापून पुष्पगुच्छ व “तथागत” महामानवांवरील पुस्तके भेट
Next: वणी नगर परिषद मतमोजणी २१ डिसेंबरला; पारदर्शकतेवर चर्चा

Related Stories

ChatGPT Image Jul 5, 2026, 06_57_25 PM_11zon
  • वणी

निर्गुडा नदी पुलावरील सुमारे २० फूट कठडे तुटले; मोठ्या अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी

NewWaniDiary 05/07/2026
ChatGPT Image Jul 2, 2026, 03_43_04 PM_11zon
  • वणी

उकणी खंड-1 प्रकल्पग्रस्तांच्या साखळी उपोषणाला संजय खाडे यांची भेट; न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याची ग्वाही

NewWaniDiary 02/07/2026
SAVE_20260628_213423_11zon
  • वणी

दामले फैल सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

NewWaniDiary 28/06/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.