
वणी – आज वणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच, वणी यांच्या वतीने ८ फेब्रुवारी २०२५ रोजी वणी येथील शासकीय मैदानावर माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमगीत आणि प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील लोकप्रिय भीमगीत गायिका, भीम कन्या कडूबाई खरात आपली सुमधुर गाणी सादर करून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे महत्व सांगणार आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून उभ्या राहून त्या समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत.
माता रमाई आंबेडकर यांनी समाजासाठी केलेल्या त्यागमय योगदानाची जाणीव ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महिलांनी त्यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या कार्यक्रमाला अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंचाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
