Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • चंद्रपूर
  • अशोककुमार उमरे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी निवड
  • चंद्रपूर

अशोककुमार उमरे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी निवड

NewWaniDiary 19/10/2025

वणी (प्रतिनिधी) – दि. १५ आक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता ठाणे येथील छेडा ऑर्केड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ( रिपाइं) बैठक रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ राजेंद्र गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

सदर बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. गौतम गोसावी यांनी चंद्रपूर गडचांदूर येथील अशोककुमार उमरे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक डॉ बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य रिपाई निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. गौतम गोसावी साहेब यांनी महाराष्ट्र कार्यकारणी जाहीर केली. त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून मान. जक्कापा कांबळे यांचे एकमताने व बिनविरोध निवड करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कार्यकारणी पुढील प्रमाणे-

महाराष्ट्र राज्य खजिनदार पदी मा. गौतम पांडुरंग गोसावी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड १) विजय पंडित २) श्रीकांत नानासाहेब सावंत ३) गोकुळ पांडे ४) दीपक पाटील ५) बबनराव शिंदे ६) पंडित टोमके. महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी १) मधुकर मांजरकर २) वसंत गवई ३) भाऊसाहेब डांगरे ४) अर्जुनराव खंडारे ५) रमेश शिवशरण ६) किशोर वाघमारे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी निवड १) मारुती सोनवणे २) गोपाळ रायपुरे ३) अशोककुमार उमरे ४) संघराज बिराजदार अशाप्रकारे निवड करण्यात आली.

Continue Reading

Previous: दिवाळी हा सण सर्वांचाच?
Next: स्थानिक रोजगारासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ठिया व रास्ता रोको आंदोलन

Related Stories

SAVE_20260416_155022
  • चंद्रपूर

गुडसेला येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण

NewWaniDiary 16/04/2026
SAVE_20260203_123401
  • चंद्रपूर

गणराज्य दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अवमानाविरोधात कठोर कारवाईची मागणी

NewWaniDiary 03/02/2026
SAVE_20260127_164735
  • चंद्रपूर

गणराज्य दिनानिमित्त हरदोना खुर्द येथे सांस्कृतिक कार्यक्रम; अनैशा वाहन चालक कामगार संघटनेतर्फे शिक्षकांचा सत्कार

NewWaniDiary 29/01/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.