
दिर्घ पडलेली सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दयनीय अवस्था..

वणी – शहरातील दामले फैल (दलित वस्ती) येथील सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, तुंबलेल्या गटाऱ्यांमुळे परिसरात दुर्गंधी आणि आरोग्यविषयक धोके वाढले आहेत. सदर शौचालयाच्या नवीन बांधकाम मंजूर झाल्याचे नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून (माजी नगराध्यक्ष) रायपुरे यांना सांगण्यात आले होते, परंतु अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
त्यामुळे आपण या कामास तत्काळ गती द्यावी व दामले फैलातील नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही अद्याप बांधकाम सुरू झालेले नाही, त्यामुळे स्थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
माजी नगराध्यक्ष सुरेश रायपूरे यांनी यासंदर्भात आमदार, प्रशासक आणि जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
त्यांनी १० फेब्रुवारी २०२५ रोजी आमदार संजयभाऊ देरकर यांच्या कार्यालयात निवेदन दिले असले तरी आमदारांना त्याची माहिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. २२ फेब्रुवारी रोजी रायपूरे यांनी आमदारांसोबत या विषयावर चर्चा केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


