
वणी (प्रतिनिधी): घुग्घुस रोडवरील लालगुडा जवळील महामार्गावर दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एका कुटुंबातील पाच निरागस व्यक्तींचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली. अचानक झालेल्या या धडकेत भीमनगर, वणी येथील संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून शहरात शोककळा पसरली आहे.
सुट्टीच्या दिवशी रियाज शेख (वय 55) हे आपल्या मुलीस कार चालवायला शिकवण्यासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी स्कोडा कार (क्रमांक O1AH 5700) ला धडक देणारा हायवा ट्रक (क्रमांक MH 40 AK 0358, ‘जोया ट्रान्सपोर्ट’ लिहिलेले) असून जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की कारचा एकबाजू भाग पूर्णतः क्षतिग्रस्त झाला आणि या अपघाताने कारमधील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. असे नातेवाईकांकडून सांगण्यात आले. घटनेला सहा दिवस उलटूनही ट्रक चालक व ट्रक मालक यांची संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे मृतकांच्या कुटुंबीयांमध्ये तसेच स्थानिक नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या प्रकरणी पोलीस प्रशासनाने तातडीने संबंधित चालक व ट्रक मालकाविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.
