Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • दिल्लीत इंटरनॅशनल कौन्सिल पुरस्कार सोहळ्यात रमेश राजूरकर यांचा गौरव
  • वणी

दिल्लीत इंटरनॅशनल कौन्सिल पुरस्कार सोहळ्यात रमेश राजूरकर यांचा गौरव

NewWaniDiary 01/06/2026

वणी : इंटरनॅशनल कौन्सिल (International Council), ठाणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला भव्य पुरस्कार वितरण सोहळा नुकताच दिल्ली येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्याचे रहिवासी रमेश महादेवराव राजूरकर यांच्या सामाजिक व जनकल्याणकारी कार्याची दखल घेऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांना या कार्यक्रमात पुरस्कार व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

या पुरस्कार सोहळ्याचा मुख्य उद्देश सामाजिक कार्य, शिक्षण, व्यवसाय, नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच मानवकल्याणासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा गौरव करणे हा होता. कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर, उद्योगपती आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांची उपस्थिती लाभली.

इंटरनॅशनल अवार्ड कौन्सिल इंडियाच्या विश्वस्त मंडळाशी संबंधित सदस्य व प्रशासनाच्या वतीने रमेश राजूरकर यांना कुटुंबीयांसह सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी, “मानवाने मानवाची सेवा केली तर जनकल्याण साध्य होईल आणि मानवाच्या उन्नतीतून राष्ट्राची उन्नती होत राहील,” असा आशावाद व्यक्त केला.

रमेश राजूरकर यांच्या या सन्मानामुळे वरोरा तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Continue Reading

Previous: शिरपूर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी
Next: स्थानिक बेरोजगारांचे आमरण उपोषण चौथ्या दिवशी; काळे फासून प्रशासनाविरोधात तीव्र निषेध

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 09_31_16 PM_11zon
  • वणी

तेली फैलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह; आकर्षक रोषणाईने परिसर उजळला

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_58_51 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.