Skip to content
New Wani Diary

New Wani Diary

Primary Menu
  • About Us
  • Contact Us
Live
  • Home
  • वणी
  • शिरपूर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी
  • वणी

शिरपूर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

NewWaniDiary 01/06/2026

वणी (प्रतिनिधी): वणीजवळील शिरपूर येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागेश गोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गणेश डाहुले, उपसरपंच मोहित चचडा, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रमोद मंदे, पोलीस पाटील सुवर्णा बोंडे, लता फेतफुलवार, वासुदेव मंदे तसेच नत्थुजी उरकुडे उपस्थित होते.

यावेळी खुशी माहुरे हिने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर मनोगत व्यक्त केले. तर नागेश गोरे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा आणि आदर्श शासनव्यवस्थेचा गौरव करत त्यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद फेतफुलवार यांनी केले. सूत्रसंचालन सौ. मधुमती बोधे यांनी केले, तर विनोद मंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक बोधे, दिवाकर घोरुडे, अनिकेत घोरुडे, सुमित घोरुडे, सूरज उरकुडे, आदित्य माहुरे, शंकर चामाटे, सुभाष नीर, तेजस बोधे, लता गोरे, अनिता घोरुडे, माधुरी मंदे, वंदना बोधे, चंद्रकला बोधे, आशा गोरे, आशा घोरुडे, रेखा घोरुडे, मनीषा घोरुडे, बेबी घोरुडे, सपना बोधे, ललिता नीर, माया उरकुडे, रुंदा उरकुडे आणि रुंदा मंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतींना अभिवादन करत उपस्थितांनी त्यांच्या आदर्श कार्यातून प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला.

Continue Reading

Previous: वणीतील दामले फैलमध्ये भीषण पाणीटंचाई; नागरिकांना टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ
Next: दिल्लीत इंटरनॅशनल कौन्सिल पुरस्कार सोहळ्यात रमेश राजूरकर यांचा गौरव

Related Stories

ChatGPT Image Sep 4, 2026, 09_31_16 PM_11zon
  • वणी

तेली फैलमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह; आकर्षक रोषणाईने परिसर उजळला

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_58_51 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

गरजूंना मदतीचा हात पुढे करणारे विजयबाबू चोरडिया यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
ChatGPT Image Sep 4, 2026, 03_01_27 PM_11zon
  • वणी
  • Happy Birthday

दिगंबर गोहोकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

NewWaniDiary 04/09/2026
Copyright © All rights reserved. l New Wani Diary.Com | MoreNews by AF themes.