
वणी : दि. १२ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आयोजनाच्या अनुषंगाने एक बैठक वणी पोलीस स्टेशन येथे पार पडली.
ही बैठक उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या बैठकीला ठाणेदार गोपाल उंबरकर, वणी नगर परिषदचे मुख्याधिकारी तसेच अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.


यावेळी आंबेडकरी अनुयायी आणि विविध वार्डातील समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
